भिंतीवरील घड्याळबाबा
ठण ठण ठोके देतात आणि म्हणतात
मुलांनो, सहा वाजले, आता उठा
मुलांनो, आठ वाजले, आंघोळ करा
मुलांनो, दहा वाजले, आता जेवण करा
मुलांनो, अकरा वाजले, आता शाळेत जा
आम्ही रोज घड्याळबाबांचे ऐकतो
पण रविवारी काहीच ऐकत नाही
ते म्हणतात, सहा वाजले, उठा
आम्ही सात वाजता उठतो
ते म्हणतात, आठ वाजले, आंघोळ करा
आम्ही नऊ वाजता आंघोळ करतो
ते म्हणतात, दहा वाजले, जेवण करा
आम्ही अकरा वाजता जेवण करतो
आणि रविवारी तर शाळेला सुट्टीच असते
मग घड्याळबाबा खूप रागावतात
जोरजोरात ठण ठण ठोके देतात
पण रविवारी आम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही
बाघितले तरी फक्त हसतो आणि खेळत रहातो
- कुसुमाग्रज