मानव आम्ही
अन्याय घडो कोठेही
चिडून उठू आम्ही
घाव पडो कोठेही
तडफडू आम्ही
हाल पाहून हळूहळू
होवोत कोठेही
पिळवणूक पाडील पीळ आम्हा
असो कोणाचीही
वजन आमच्या छातीवर
पायांतल्या बेड्यांचे दासांच्या
चाबूक उडो कोठेही
ळ पाठीवर आमच्या
अवघ्या अभाग्यांचे अश्रू
उभे आमच्या डोळ्यांत
दु:खितांच्या
वेदनांच्या कळा आमच्याही उरात
संवेदना सार्या जगाची
हृदयात आहे भरभरून
नाते नवीन असे काही
जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही
- अनिल