जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ३ मार्च चा इतिहास पहा.
रंजना देशमुख - (१९५५ - ३ मार्च २०००) या एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री होत्या. १९७० - १९८० च्या दशकात अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा १९८० सालचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली हाच पुरस्कार त्यांच्या ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटासाठी मिळाला. ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, ‘चानी’ हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. १९८७ साली त्यांना झालेल्या अपघातामुळे त्यांची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. ‘फक्त एकदाच’ या मराठी नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून त्यांचा मृत्यू झाला होता.
२००९:यादवेंद्र शर्मा चंद्र (राजस्थानचे सर्वाधिक चर्चित व प्रसिद्ध उपन्यासकार, कथाकार तसेच नाटककार, जन्म: ).
२०१५: डॉ. राष्ट्रबंधु (बाल साहित्याचे प्रसिद्ध साहित्यकार, जन्म: ).
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.