मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

पाणी पाणी - मराठी कविता (इंदिरा संत)

प्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत यांची पाणी पाणी ही मराठी कविता.
पाणी पाणी - मराठी कविता (इंदिरा संत)
पाणी पाणी - मराठी कविता (इंदिरा संत)

पाणी पाणी

वर कोर्‍या आभाळाची
भट्टी तापली तापली,
खाली लेकरांची माय
वारा पदराने घाली

वाऱ्याखाली कसेबसे
उभे रोप जवारीचे,
एक मलूल पोपटी
दोन सुकल्या पात्यांचे

उभी कोणाच्या दारात
रांग भुकेल्या बाळांची,
थाळा वाडगा घेऊन
अशी तिष्ठत केव्हाची

पोरक्या या अर्भकांना
एक पाणी का मिळेना,
उभा डोळ्यामधे थेंब
तो का सुकून जाईना

- इंदिरा संत

संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.